विरारमध्ये तीन बेपत्ता विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

August 27, 2014 1:49 PM0 commentsViews: 2267

Virar

27 ऑगस्ट : विरारमध्ये बेपत्ता झालेल्या तीन शालेय विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. विरारमधल्या सकवार इथल्या वगड गुरूकुल इंटरनॅशनल स्कूल या आश्रमशाळेच्या मागच्या नाल्यात हे मृतदेह सापडले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीत धाडवी, प्रफुल पटेल आणि कुशल दाढा अशी या तिघांची नावे असून नववीत शिकणारे होते. हे तिघेही 25 ऑगस्टच्या रात्रीपासून बेपत्ता होते.

आज सकाळी आश्रमशाळेच्या बाजूला असणार्‍या शेतात काम करणार्‍या एका महिलेला बाजूच्या नाल्यात तीन मृतदेह दिसून आले. ही मुल आश्रमशाळेच्या मागच्या भिंतीवरुन उडी मारून पळून जात असताना नाल्यात पडली असावीत असा अंदाज व्यक्त होत आहे. शाळेत देण्यात येणार्‍या शिक्षेला घाबरुन ही मुलं पळून जात असावीत असा आरोप यामुलांच्या पालकांनी केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close