आरोप सिद्ध झाले तर राजकारण सोडेन -राजनाथ सिंह

August 27, 2014 6:32 PM0 commentsViews: 2524

rajnath singh 327 ऑगस्ट : मुलाच्या तिकीटावरून असलेल्या वादामुळे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह कमालीचे नाराज असल्याची चर्चा आहे. राजनाथ सिंह यांच्या मुलाला उत्तर प्रदेशमध्ये पोटनिवडणुकीत नोएडातून तिकीट द्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नकार दिल्याचं बोललं जातंय.

यानंतर पक्षांतर्गत विरोधकांकडून आपल्या मुलाबद्दल चुकीच्या बातम्या पसरवत असल्याची तक्रार राजनाथ सिंह यांनी संघाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आपल्यावरचे किंवा कुटुंबीयांवरचे कोणतेही आरोप सिद्ध झाले तर आपण राजकारण सोडू असं राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलंय. याबाबत पंतप्रधान कार्यालयानंही एक निवेदन प्रसिद्ध केलंय. हे वृत्त धादांत खोटे आणि हेतूपुरस्सर आहेत. सरकारची प्रतिमा मलीन करण्यासाठी या सर्व अफवा पसरवल्या जात आहे.

चारित्र्य हनन आणि सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न आहे. जे अशा अफवा पसरवतायत, ते देशाचं नुकसान करत आहे. याचं आम्ही ठामपणे खंडन करतो असं स्पष्टीकरण पंतप्रधान कार्यालयाने दिलं. तर राजनाथ यांनी तक्रार केल्याची चर्चा निराधार असल्याचं संघानंही म्हटलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close