ललित मोदींचा भारतात परतण्याचा मार्ग मोकळा

August 27, 2014 4:35 PM0 commentsViews: 677

56lalit_modi27 ऑगस्ट : आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ललित मोदींना पुन्हा एकदा पासपोर्ट वापरण्यास दिल्ली हायकोर्टाने परवानगी दिली आहे.

त्यामुळे मोदींचा भारतात परत येण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 2010 ला आयपीएलमधील गैरव्यवहारांच्या आरोपांनंतर ललित मोदींवर बीसीसीआयने आजीवन बंदी घातली होती.

त्याचबरोबर त्यांच्याविरोधात आर्थिक गैरव्यवहार आणि पैशाच्या अफरातफरीचे आरोप केले गेले होते. यानंतर 2011 मध्ये ललित मोदींचा पासपोर्ट भारत सरकारने अवैध ठरवला होता. पण आता भारतीय पासपोर्ट वापरण्यास मोदींना कोर्टाने परवानगी दिली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close