ट्रॅक्टर पोळा

August 27, 2014 9:35 PM0 commentsViews: 438

27 ऑगस्ट : भंडारा जिल्ह्यातल्या मोहाडी तालुक्यातल्या कुशारी गावात अगदी अनोखा पोळा साजरा करण्यात आला. हा पोळा बैलांचा नाही तर ट्रॅक्टरचा होता. अनेक शेतकरी शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर वापरू लागलेत. त्यामुळे अनेकांकडे जनावरंच नाही. पण, संस्कृती तर जपायचीय. म्हणून मग या गावातल्या शेतकर्‍यांनी ही अनोखी शक्कल लढवलीय. पोळ्याला जसं बैलाला सजवलं जातं तसंच ट्रॅक्टर सजवण्यात आले. मग प्रत्येकानं आपापला ट्रॅक्टर गावाबाहेरच्या पटांगणावर आणून त्यांची पूजा केली. या पोळ्यात पन्नासच्यावर ट्रॅक्टर सहभागी झाले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close