नारायण राणे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर ?

August 27, 2014 10:29 PM0 commentsViews: 6712

Narayan Rane resigns27 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते आणि विधानसभा निवडणुकीचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांच्यापुढे आणखी एक ‘विघ्न’ उभं ठाकलं आहे. आता नारायण राणे द्विधा मन:स्थितीत असून विधानसभा निवडणूक लढवण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

काँग्रेस प्रचार समितीच्या प्रमुखपदाला न्याय द्यायचा की कुडाळमध्येच अडकून राहायचं असा पेच राणेंसमोर आला आहे. कुडाळचं वातावरण अजूनही राणेंसाठी पूर्णपणे पोषक नसल्याचा अहवाल असल्याची माहिती सूत्रांकडून IBN लोकमतला मिळाली आहे. कुडाळमधून संदेश पारकर यांच्या नावाची राणेंकडून शिफारस होऊ शकते. तर कणकवलीमधून आपला मुलगा नितेश राणेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. त्यामुळे राणे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नारायण राणे यांचं नाराजीनाट्य चांगलंच गाजलं. पण या नाराजीनाट्यानंतर राणेंनी माघार घेतली खरी पण यांचं फलित म्हणून त्यांच्या पदरात काँग्रेसच्या निवडणुकीचं प्रचारप्रमुखपद पडलं. त्यामुळे राणे काहीसे सुखावले गेले. पण राणेंच्या मागे शुक्लकाष्ठ काही सुटेना.
आज काँग्रेसच्या राज्य निवड मंडळाची बैठक झाली. या बैठकीत 2009 साली काँग्रेस 174 जागांवर लढली होती त्या जागांचा पुन्हा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये नारायण राणे सिंधुदुर्गमधील कुडाळ मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास द्विधा मन:स्थितीत असल्याचं कळलंय.

प्रचारसमितीला पूर्ण न्याय द्यायचा की कुडाळमधून लढायचं असा प्रश्न राणेंना पडलाय. राणेंनी कुडाळ मतदारसंघाचा अहवाल मागवला होता पण या अहवालात कुडाळमधलं राजकीय वातावरण हे राणेंसाठी पोषक नसल्याचं दिसून आलं. कुडाळमध्ये काहीसं वातावरण हे राणेंच्या विरोधात आहे. त्यामुळे ‘रिस्क’ घ्यायची की नाही असा प्रश्न राणेंना पडलाय. राणेंकडे प्रचारप्रमुखपद आहे त्यामुळे राज्यात प्रचार करायचा की कुडाळमध्ये अडकून बसायचं यात राणे अडकले आहे.

त्यामुळेच कुडाळमधून राणे निवडणूक लढवणार नाही अशी शक्यता निर्माण झाली आहे. यासाठी राणे आपले विश्वासू संदेश पारकर यांच्या उमेदवारीसाठी शिफारस करण्याची शक्यता आहे. तर कणकवलीमधून धाकटा मुलगा नितेश राणे यांना तिकीट देण्यात यावं असा आग्रह राणेंचा आहे. त्यामुळे राणे विधानसभा निवडणूक लढवतील का असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close