जागावाटपाचा तिढा, महायुतीत आठवलेही नाराज ?

August 27, 2014 10:53 PM0 commentsViews: 2255

ramdas athavale on joshi27 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे परंतु महायुतीत अजूनही धुसफूस चालू असल्याची चिन्हं आहेत. महायुतीत आरपीआयला सहा जागा अमान्य आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेवरुन खाली खेचण्यासाठी महायुतीची गरज आहे, पण आरपीआयचा अपमान करुन कमी जागा स्वीकारणार नाही अशी भूमिका रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतली आहे.

त्यामुळे महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींपाठोपाठ रामदास आठवलेंही नाराज असल्याची चिन्हं आहेत. सोलापूरमध्ये आज आरपीआयनं भूमीमुक्ती मोर्चाचं आयोजन केलं होतं. यावेळी आठवलेंनी आपली नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, विधानसभेच्या जागावाटपावरून महायुतीतील घटक पक्षांची नाराजी वाढत असली तरी भाजप आणि शिवसेनेन कधीही न जिंकलेल्या राज्यातील 78 जागांपेकी काही जागा महायुतीतील घटक पक्षांना देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

महायुतीतील घटक पक्ष आरपीआयने राज्यातल्या 25 जागा मागितल्या असून यापैकी पराभूत जागा न देण्याचीही अट टाकलीय. त्यामुळे या पराभूत जागा महायुतीतील घटक पक्षांना मिळाल्या तर नाराजी आणखी वाढू शकते, अशी शक्यता आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close