मतमोजणीसाठी मुंबईत कडी सुरक्षा

May 15, 2009 4:51 PM0 commentsViews: 2

15 मे लोकसभा निवडणुकांच्या मुंबईतील मतमोजणीसाठी 15 पोलिस उपायुक्त, 40 सहाय्यक पोलीसउपायुक्त, 1237 पोलिस अधिकारी, 6912 पोलिस कर्मचारी, एसआरपीचे 37 प्लाटुन्स तैनात करण्यात आले आहेत. यातील तीन पोलीस कंपन्या बाहेरून मागवण्यात आल्या आहेत. मुंबईत 2614 लोकांवर विविध कायद्यांच्या अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात सीआरपीएफ धारा 144 लागू करण्यात आली आहे. जमावबंदी आणि ध्वनिप्रदुषणविरोधी कायदा लागू करण्यात आलाय. विजयी उमेदवारांना फटाके वाजवून ध्वनीप्रदुषण करू नये असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. हा इशारा न मानल्यास ध्वनिप्रदुषणविरोधी कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

close