सुवर्णगणेश!

August 28, 2014 1:33 PM0 commentsViews: 292

28 ऑगस्ट : गणपती बाप्पाच्या आगमनाला आता दोनच दिवस उरले आहेत. भांडूपच्या प्रान्डा ज्वेलर्सनं साडेतीन फूट उंचीची संपूर्ण सोन्याची आकर्षक मूर्ती बनवली आहे. या सुवर्णगणेशाची किंमत सोळा लाख पासष्ट हजार रुपये असून ही मूर्ती थायलंडमध्ये बनवण्यात आलीये. आकर्षक नक्षीकाम केलेला हा सुवर्णगणेश भांडूपच्या मॅग्नेट मॉलमध्ये ठेवण्यात आलाय.येत्या गणेशोत्सवात याची प्रतिष्ठापना करुन पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येईल असं प्रान्डा ज्वेलरर्सच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. गणेशोत्सवानंतर हा सुवर्णगणेश विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close