बाप्पांसाठी सुबक देवघर

August 28, 2014 2:11 PM0 commentsViews: 161

प्रवीण मुधोळकर ,नागपूर

28 ऑगस्ट : गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या काळात घरांमध्ये बाप्पांसाठी खास देव्हाराही आणला जातो. नागपूरात तयार होणारे इकोफ्रेंडली आकर्षक असे देव्हारे सध्या आकर्षणाचे केंद्र बनलेत. या देव्हार्‍यांची ही खास ओळख.

नागपुरातल्या बाजारात सध्या दिसताहेत सागवान आणि काचेतून साकारलेले हे सुबक देव्हारे, खास गणेशोत्सवासाठी हे देव्हारे बनवण्यात आलेत. लाकडावरचं बारिक नक्षीकाम सगळ्यांचं लक्ष वेधतात. तर काचेत दिसणारं फुलं, हळदीकुंकू आणि दिव्याच्या प्रकाशाचं प्रतिबिंब यामुळे या देव्हार्‍याला अधिकच शोभा येतेय.

काही देव्हार्‍यांमध्ये तर चक्क 24 कॅरेट गोल्ड प्लेटींगसुद्धा केलीय. त्यामुळे सध्या या देव्हार्‍यांना चांगलीच पसंती मिळतेय.

दहा दिवसांचा पाहुणा असणार्‍या गणरायांची आठवण कायम आपल्या सोबत राहावी, यासाठी या आकर्षक काचेच्या देव्हार्‍याकडे भक्तांचा कल आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पाच हजारांपासून सुरु होणारे हे देव्हारे 15 लाखापर्यंतच्या किमतीचे आहे. बाप्पाची आठवण सदैव घरात राहावी यासाठी गणेशोत्सवादरम्यान देव्हारे आणण्यामागे भक्ताची भावना आहे.

विद्येची आणि कलेची देवता गणरायाच्या वेगवेगळ्या आकर्षक रुपांना या देव्हार्‍यामुळे आणखीच सौंदर्य प्राप्त होतं. त्यामुळेच यंदा अनेकांकडे या काचेच्या देव्हार्‍यांमध्ये बाप्पा विराजमान होणार आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close