इंडियन सुपर लीगचा ‘श्रीगणेशा’

August 28, 2014 7:26 PM0 commentsViews: 3158

Indian Super League 28 ऑगस्ट : अवघ्या जगाने अलीकडेच ब्राझीलमध्ये फुटबॉल वर्ल्डकपचा थरार ‘याची देही याची डोळा’ अनुभवाला पण जगाच्या पाठीवर फुलबॉल सारखाच्या थरारक खेळात मात्र भारताचे स्थान अजूनही धूसरच आहे. हीच कमी लक्षात घेऊन आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने इंडियन सुपर लीगचा ‘श्रीगणेशा’ करण्यात आलाय. भारतात पहिल्यांदाच फुटबॉलचा थरार आता फुटबॉलप्रेमींना अनुभवता येणार आहे.

आज (गुरुवारी) मुंबईत एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये इंडियन सुपर लीगचा मोठ्या दिमाखात शुभारंभ करण्यात आला. इंडियन सुपर लीगमधून आपल्याला भारताचे उद्याचे फुटबॉल स्टार्स मिळणार आहेत पण या नवा ‘मोहिमे’ची सुरुवात केली ती रिलायन्स फायउंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांनी. देशात फुटबॉल सारख्या खेळाला एक वेगळा दर्जा मिळेल याचा येणार्‍या पिढीला मोठा फायदा होईल असा विश्वास नीता अंबानी यांनी व्यक्त केला.

या लीगच्या निमित्ताने क्रिकेटपटू आणि अभिनेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले आहेत. आजच्या या सोहळ्याला मास्टर ब्लास्टर आणि विक्रामादित्य सचिन तेंडुलकर, अभिनेता रणबीर कपूर, जॉन अब्राहम,अभिषेक बच्चन हजर होते. यावेळी देशात फुटबॉलला अधिक उंची लाभेल अशा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

येत्या 12 ऑक्टोबर ते 20 डिसेंबरपर्यंत इंडियन सुपर लीगचं पहिलं सिझन पार पडणार आहे. या लीगमध्ये एकूण आठ टीम असणार आहे. दिल्ली, गोवा, गुवाहटी, कोची, कोलकाता, मुंबई पुणे आणि चेन्नई या टीममध्ये हा मुकाबला रंगणार आहे. आयसीएलमध्ये बक्षिसांचंही खास आकर्षण आहे. बक्षिसाची एकूण रक्कम ही 15 कोटी इतकी आहे. प्रत्येक फ्रँचाईझीची किंमत ही 120-180 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे प्रत्येक टीममध्ये 14 भारतीय प्लेअर्स असणार आहे त्याच्याबरोबर 7 परदेशी प्लेअर्सही असणार आहे.

अशा आहेत इंडियन सुपर लीगच्या टीम्स

  • ऍटलेटिको कोलकाता
  • चेन्नई टायटन्स
  • दिल्ली डायनामोज
  • गोवा फुटबॉल क्लब
  • केरला ब्लास्टर्स
  • मुंबई सिटी फुटबॉल क्लब
  • नॉर्थ ईस्ट युनायटेड
  • पुणे सिटी फुटबॉल क्लब

 आयसीएलचे टीम मालक

  • ऍटलेटिको कोलकाता : सौरव गांगुली, ऍटलेटिको मादि्रद
  • चेन्नई टायटन्स : अभिषेक बच्चन, इंटर मिलान
  • दिल्ली डायनामोज : डेन नेटवर्क
  • गोवा फुटबॉल क्लब (FC): वेणूगोपाल धूत, साळगांवकर, डेम्पो
  • केरला ब्लास्टर्स : सचिन तेंडुलकर, पीव्हीपी व्हेंचर्स
  • मुंबई सिटी एफसी : रणबीर कपूर, बिमल पारेख
  • नॉर्थ ईस्ट युनायटेड : जॉन अब्राहम, शिलाँग लजाँग
  • पुणे सिटी एफसी : सलमान खान, वाधवान ग्रुप

बक्षिसांची लयलूट

  • बक्षिसाची रक्कम : 15 कोटी रुपये
  • प्रत्येक फ्रँचाईझीची किंमत : 120-180 कोटी रुपये
  • मार्की प्लेअर्सची किंमत : 750,000 डॉलर्स
  • मार्की मॅनेजरची किंमत : 250,000 डॉलर्स
  • मार्की प्लेअर्स : 8
  • परदेशी खेळाडू : 56
  • भारतीय खेळाडू : 112
  • प्रत्येक टीम खेळणार्‍या मॅचची संख्या : 14
  • 2 सेमीफायनल : होम आणि अवे फॉरमॅट

असं आहे आयसीएलचे स्वरुप

  • प्रत्येक टीममध्ये 7 परदेशी प्लेअर्स
  • प्रत्येक टीममध्ये 14 भारतीय प्लेअर्स
  • प्रत्येक टीमला एक मार्की (आयकॉन) प्लेअर्स
  • अंतिम 11 मध्ये सहा परदेशी खेळाडू
  • अंतिम 11 मध्ये 5 भारतीय खेळाडू
  • 12 ऑक्टोबर 2014 : ओपनिंग मॅच
  • कोलकाता वि. मुंबई : पहिली मॅच : सॉल्ट लेक स्टेडियम
  • 20 डिसेंबर 2014 : फायनल

 आयसीएलमधील परदेशी क्लब

  • ऍटलेटिको मादि्रद, स्पेन : कोलकाता
  • फिओरेंटिना, इटली : पुणे
  • फायेनूर्ड, हॉलंड : दिल्ली
  • इंटर मिलान, इटली : चेन्नई

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close