ठरलं !, 3 आणि 4 सप्टेंबरला पाटील, पाचपुते भाजपमध्ये

August 28, 2014 9:03 PM0 commentsViews: 2371

suryakanta patil babarao pachpute28 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे. परंतु दुसरीकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला गळती सुरूच आहे. राष्ट्रवादीचे नेते 3 आणि 4 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार अशी माहिती खुद्ध विरोधी पक्षनेते एकनाथ खडसेंनी आयबीएन लोकमतला दिलीय.

3 सप्टेंबरला दिल्लीत राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील आणि काँग्रेसचे नेते आणि अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव खतगावकर-पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आणि 4 सप्टेंबरला मुंबईत राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपुते आणि डॉ. माधव किन्हाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार असं खडसे यांनी सांगितलंय.

तीन दिवसांपूर्वीच सूर्यकांता पाटील, भास्करराव खतगावकर, बबनराव पाचपुते येणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी जाहीर केलं होतं. यापैकी काही जणांना येत्या आठ दिवसात प्रवेश देणार असल्याचंही खडसेंनी स्पष्ट केलं. याव्यतिरिक्त आघाडीचे माजी आमदार आणि खासदारांची संख्याही 24 ते 25 इतकी आहे. या सर्वांना टप्प्या-टप्प्याने प्रवेश देणार आहोत. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी आणि माझी भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली असा खुलासाही खडसे यांनी केला होता.

सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाराजी व्यक्त करत पक्षाला रामराम ठोकला आहे. अहमदनगरचे राष्ट्रवादीचे नेते बबनराव पाचपुते यांनीही राष्ट्रवादीला सोठचिठ्ठी दिली आहे. काँग्रेसचे नेते आणि अशोक चव्हाण यांचे मेव्हणे भास्करराव खतगावकर काँग्रेसमधून बाहेर पडले आहे. मात्र बबनराव पाचपुते भाजपमध्ये येणार आहेत, असं एकनाथ खडसेंनी सांगितलंय. पण आपण अपक्ष म्हणून लढणार असल्याचं पाचपुतेंनी आयबीएन-लोकमतशी बोलताना सांगितलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close