यूपीएची आघाडीकडे वाटचाल,एनडीएला टाकलं मोठ्या फरकानं मागे

May 16, 2009 6:02 AM0 commentsViews:

16 मे, आतापर्यंतच्या मतमोजणीत युपीए आघाडीवर असून एनडीए दुसर्‍या तर तिसरी आघाडी तिसर्‍या नंबरवर आहेत. महाराष्ट्रात आघाडी आणि युतीमध्ये अटीतटीची लढत असून आतापर्यंत आघाडी पुढे आहे. उत्तरप्रदेशात काँग्रेसनं मुसंडी मारली . बसपाच्या हत्तीची चाल मंदावली. सत्तास्थापनेत नितीशकुमार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. बिहारमध्ये स्पष्ट आघाडीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक आणि अण्णाद्रमुकमध्ये चुरस आहे. तर कर्नाटकात भाजप आघाडीवर आहे. राजधानी दिल्लीत काँग्रेसचंच वर्चस्व कायम असून सर्वच्या सर्व सहा जागांवर आघाडी दिसून येतेय.