‘गोपीनाथ मुंडेंना त्रास देणार्‍यांनी आता पुळका दाखवू नये’

August 28, 2014 11:18 PM0 commentsViews: 6814

pankja vs dhanjaya28 ऑगस्ट : ज्यांनी जिवंतपणी गोपीनाथ मुंडे यांना यातना दिल्या त्यांना मरणानंतर पुळका येण्याची गरज नाही त्यांना जनताच उत्तर देईल असा खणखणीत टोला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांनी धनंजय मुंडे यांचं नाव न घेता लगावला. तसंच मी जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हा गोपीनाथ मुंडे खासदार होते आणि ते मला सिंदखेड राजामधून लढावं अशी मुंडे साहेबांची इच्छा होती, असंही त्यांनी सांगितलं. पंकजा मुंडे यांची ‘संघर्ष यात्रा’ आज (गुरुवारी) बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा इथून सुरू झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या. या सभेला भाजप प्रदेशाध्यक्षपद देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते यावेळी उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाची चौकशी व्हावी अशी मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र बीडमध्ये गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या झालेला सत्तासंघर्ष सर्वश्रूत्र आहे. धनंजय मुंडेंनी भाजपमधून बाहेर पडून गोपीनाथ मुंडेंवर सडकून टीका केली होती. पंकजा मुंडेंनी जुन्या गोष्टींची आठवण करुन देत धनंजय मुंडेंना सडेतोड उत्तर दिलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close