गणेशोत्सवासाठी पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त

August 29, 2014 8:10 AM0 commentsViews: 184

police in girgon29 ऑगस्ट : गणपती बाप्पांचं आगमन होतंय आणि गणपती उत्सवासाठी पुणे शहरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त सतिश माथूर यांनी दिली.

गणपती उत्सवादरम्यान शहरात कोणतीही दूर्घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एन.एस.एसच्या तीन हजार विद्यार्थ्यांना पोलीस विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

तसेच गणेश मंडळाच्या सिक्युरीटी युनिट आणि ट्रॅफिक मॅनेजमेट युनिटलाही पोलीस विभागातर्फे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. शहरात वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून काही शाळाच्या पंटागणात पाकीर्ंग प्लॉट्सही तयार करण्यात आलं आहेत असं पोलीस आयुक्त सतिश माथूर यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close