सोनई हत्याकांडाच्या न्यायालयीन कामकाजाला सुरूवात

August 29, 2014 8:20 AM0 commentsViews: 395

sonai29 ऑगस्ट : सोनईत तिहेरी हत्याकांडाच्या न्यायालयीन कामकाजाला आजपासून नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. दीड वर्षांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यातील सोनई गावात मेहेतर समजाताल्या तीन तरुणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.

ही हत्या जातीच्या खोट्या प्रतिष्ठेमुळे झाल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. सचिन, राहुल आणि संदीप या तीन तरुणांची संशयित आरोपींनी हत्या केली होती. अहमदनगर जिल्ह्यात हा खटला चालवताना दबाव येत असल्याची पीडित कुटुंबियांची तक्रार होती.

त्यासाठी हा खटला अहमदनगर जिल्हयाबाहेर वर्ग करण्यासाठी त्यांनी औरंगाबाद हायकोर्टात याचिकाही दाखल केली होती. त्यावेळी कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार हा खटला नाशिक कोर्टात चालणार आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या केसच्या संदर्भात नाशिक कोर्टात कामकाजाला सुरुवात केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close