यूपीएची सगळ्यात मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल : 250 जागांवर घोडदौड

May 16, 2009 7:23 AM0 commentsViews: 10

16 मे, यूपीएनं सगळ्यात मोठ्या आघाडीच्या दिशेनं वाटचाल सुरू केली आहे. यूपीएला स्वबळावर 250 जागा मिळाल्यात. अशा वेळी चौथ्या आघाडीच्या मदतीनं यूपीए 272 हा बहुमताचा आकडा पार करेल अशी चिन्हं आहेत. त्यामुळे यूपीएला डाव्यांच्या पाठिंब्याची गरज उरणार नाही, अशी शक्यता आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांमध्ये 543 जागांपैकी यूपीएला 250 जागांची आघाडी मिळाली आहे. त्यापैकी काँग्रेस 184, डीएमके 16, तर राष्ट्रवादी 11 जागांवर आघाडीवर आहे. उत्तरप्रदेशातही यावेळी काँग्रेसनं चांगली मुसंडी मारलीय. सत्ताधारी बसपाला मागे टाकत काँग्रेस इथे 20 जागांवर आघाडीवर आहे. महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी 24 जागांवर आघाडीवर आहे. तर राजस्थान मध्येही काँग्रेसने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग आज दुपारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत, त्यानंतर पुढची रणनिती ठरण्याची शक्यता आहे. मनमोहनसिंग यांच्या धोरणाचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षातून व्यक्त होत आहे.

close