एक गाव बाप्पाविना…स्तब्ध आणि गोठलेलं !

August 29, 2014 7:17 PM0 commentsViews: 1703

malin new bappa29 ऑगस्ट : देशभरात गणपतीचं आगमन मोठ्या थाटामाटात होतंय पण एक गाव असं आहे, जिथे या वर्षी गणपतीची स्थापना होणार नाही.

महिन्याभरापूर्वी डोंगराच्या ढिगार्‍याखाली गाडल्या गेलेल्या पुणे जिल्ह्यातील माळीणमध्ये यंदा गणपतीची प्रतिष्ठापना होणार नाही. या घटनेतून वाचलेल्या ग्रामास्थांना असाणेच्या आश्रमशाळेत राहायला जाग दिलीय.

आमच्या प्रतिनिधीनं आज तिथे भेट दिली तेव्हा
गावकर्‍यांनी गेल्या वर्षीच्या गणपतीच्या आठवणी ताज्या केल्या त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

आता माळीणमध्ये कधी कधीच गणपती बसणार नाही अशी खंत गावकरी व्यक्त करत आहे. माळीणमध्ये डोंगरकडा कोसळून 151 जणांचा मृत्यू झाला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close