वक्तव्याचा विपर्यास, हेपतुल्ला यांची सारवासारव

August 29, 2014 6:27 PM0 commentsViews: 828

najma29 ऑगस्ट: केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री नजमा हेपतुल्ला त्यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. भारतात राहणार्‍या सर्वांना हिंदू म्हणण्यात गैर काहीच नाही, असं हेपतुल्ला यांनी म्हटलं होतं.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सर्व भारतीय हे हिंदू असल्याचं म्हटलं होतं. त्यालाच हेपतुल्ला यांनी दुजोरा दिला. पण, त्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटल्यानंतर आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचं हेपतुल्ला यांनी म्हटलं आहे.

हिंदू ही भारतीयांची ओळख असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्याला पण आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला जात असल्याचं असं सांगत हेपतुल्ला यांनी सारवासारव केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close