लष्करी सामग्रीच्या खरेदीला मंजुरी,ऑगस्टा वेस्टलँड ब्लॅकलिस्टमध्ये

August 29, 2014 9:44 PM0 commentsViews: 1644

agusta helicopter29 ऑगस्ट : संरक्षण मंत्रालयाने आज लष्करी सामग्रीच्या खरेदीच्या 17 हजार 500 कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. त्याचवेळी 197 हलकी हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याचा सहा हजार कोटी रुपयांच्या निविदा रद्द करण्यात आल्या आहेत.

ऑगस्टा वेस्टलँड या कंपनीनंही निविदा भरली होती. त्या कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्यात आलंय. त्यामुळे या निविदा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. गेल्या 7 वर्षांतली संरक्षण क्षेत्रातली निविदा रद्द करण्याचा हा दुसरा प्रसंग आहे.

विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौसेनेच्या कार्यक्रमात आणि स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात लष्कराला अधिक सक्षम करण्याबाबत भाष्य केलं होतं. त्यानंतर अर्थसंकल्पातही लष्करासाठी तरतूद करण्यात आली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close