सी.विद्यासागर राव यांनी घेतली राज्यपालपदाची शपथ

August 30, 2014 6:13 PM0 commentsViews: 550

vidhyasagar rao30 ऑगस्ट :  महाराष्ट्राचे नव नियुक्त राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनात दुपारी 4 वाजता शपथविधीचा हा छोटेखानी कार्यक्रम पार पडला. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मोहत शहा यांनी सी.विद्यासागर राव यांना शपथ दिली. या शपथविधीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेक मंत्री यावेळी उपस्थित होते.

माजी राज्यपाल के शंकरनारायन यांची मिझोरामला बदली करण्यात आली होती. याबदलीला धुडकावून लावत शंकरनारायन यांनी राजीनामा दिला. त्यानंतर राय यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

विद्यासागर राव हे भाजपचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांच्या तत्कालिन मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री होते. विद्यासागर राव हे आंध्रप्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आहे.

वाजपेयी यांच्या तत्कालीन मंत्रिमंडळात त्यांनी गृहराज्यमंत्रीपद भूषवलं आहे. तसंच 12 व्या आणि 13 व्या लोकसभेत आंध्रप्रदेशातून निवडून आले होते तर आंध्रप्रदेशात तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते.

कोण आहेत विद्यासागर राव ?

  • - विद्यासागर राव हे आंध्रप्रदेशमधले भाजपचे नेते
  • - वाजपेयींच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री
  • - 12 व्या आणि 13 व्या लोकसभेत आंधङ प्रदेशातून निवडून आले
  • - आंध्रप्रदेशात तीन वेळा आमदार

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close