केंद्राऐवजी राज्यातच काम करायचं -पंकजा मुंडे

August 30, 2014 4:22 PM0 commentsViews: 2076

pankaja_news30 ऑगस्ट : महिन्याआधी लोकसभेची निवडणूक झाली असती तर मी निवडणूक लढवली असती पण आज मला वैयक्तिक राज्यातच काम करायला आवडेल अशी इच्छा भाजपच्या आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलीये. केंद्रात जाण्याऐवजी मला राज्यातच जास्त रस आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

त्याबरोबरच महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळायला हरकत नाही. पण सध्या मी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्यांचं नेतृत्व सांभाळण्यासाठी हे काम करत आहे. त्यामुळे लोकांना काहीही वाटलं तरी आपण मुख्यमंत्रीपदासाठी मी स्वत:ला दावेदार मानत नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. नांदेडमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

विशेष गोपीनाथ मुंडे यांच्या जागी पंकजा मुंडे यांची वर्णी लागावी यासाठी भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू केले आहे. अगोदरच भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी दावे प्रतिदावे केले जात आहे. आता एकाप्रकारे पंकजा मुंडे यांनी केंद्रात नको राज्यात काम करण्याची इच्छा व्यक्त करुन मुख्यमंत्रीपदाच्या शर्यती आपणही असल्याचे संकेत दिले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close