वर्ध्यात काँग्रेसच्या दत्ता मेघेंना मिळालं यश

May 16, 2009 10:24 AM0 commentsViews: 12

16 मे, वर्धा वर्ध्यात काँग्रेसचे दत्ता मेघे यांनी 95 हजार 928 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार खासदार सुरेश वाघमारे यांचा पराभव केला आहे. बसपच्या विपीन कंगाले यांनी 1 लाख 31 हजार 542 मतं मिळवूनही दत्ता मेघे हे मजबूत मत्ताधिक्याने विजयी ठरले आहेत. दत्ता मेघे यांना 3 लाख 52 हजार 853 मतं तर सुरेश वाघमारे यांना 2 लाख 56 हजार 925 मतं मिळाली आहेत. वर्धा मतदारसंघात दत्ता मेघे यांनी मजबूत मत्ताधिक्य घेत सर्वांचे अंदाज धुळीस मिळवले आहेत. निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वीच दत्ता मेघे यांनी राष्ट्रवादी काग्रेस पक्ष सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

close