पेट्रोल 1 रुपये 82 पैशांनी स्वस्त

August 30, 2014 9:46 PM0 commentsViews: 1659

Petrol30 ऑगस्ट : महागाईच्या खाईत होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेला केंद्र सरकारने दिलासा दिलाय. पेट्रोल दरात 1 रुपये 82 पैशांनी कपात करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे डिझेलच्या दरात 50 पैशाने वाढ करण्यात आली आहे. नवी दरवाढ आणि दरकपात आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

आंतराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर सुधारल्यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली आहे. आंतराष्ट्रीय बाजारात रुपया भक्कम होत असल्यामुळे आतापर्यंत तिसर्‍यांदा पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली. या दरकपातीमुळे राजधानी दिल्लीत तब्बल एक वर्षानंतर पेट्रोलचे दर प्रतिलिटर 70 रुपयांच्याखाली आले आहे. मोदी सरकार सत्तेवर विराजमान झाल्यानंतर पेट्रोलच्या दरात ही तिसरी दर कपात आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close