मोदींचे ‘मिशन जपान’, वाराणसीचा होणार कायापालट !

August 30, 2014 10:04 PM0 commentsViews: 2005

pm in japan30 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मिशन जपान सुरू झाले आहे. जपानमध्ये पोहचल्यानंतर पंतप्रधानांनी एक महत्वपूर्ण करार केला आहे. मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांची क्योटोमध्ये भेट झाली. या भेटीदरम्यान क्योटो- वाराणसी करारावर सह्या करण्यात आल्या.

या करारानुसार आता वाराणसीचा विकास क्योटो शहराच्या मॉडेलनुसार करण्यात येईल. क्योटोमधल्या हेरिटेज साईटचं ज्या पद्धतीने जतन करण्यात आलंय त्या पद्धतीने वाराणसीमधल्या साईटचं जतन करण्यात यावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

जपानमध्ये क्योटोला धर्मनगरी समजलं जातं. भारतीय वेळेनुसार मोदी दुपारी जपानच्या ओसाका एअरपोर्टवर उतरले आणि क्योटोच्या दिशेनं रवाना झाले. तिथं जपानचे पंतप्रधान शिंजो आबे मोदींचं स्वागत केलं. भारतीय उपखंडाच्या बाहेरची मोदींची ही दुसर्‍या देशाला पहिलीच भेट आहे.

मोदी 3 सप्टेंबरपर्यंत जपानमध्ये असतील. जपानच्या सम्राटांचीही ते भेट घेणार आहेत. नरेंद्र मोदींच्या जपान दौर्‍यात पायाभूत सुविधा, अणुऊर्जा, संरक्षण तंत्रज्ञान या क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांनी वाराणसीतून लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि वाराणसीतून सर्वाधीक मताधिक्याने विजयी झाले होते. त्याचबरोबर मोदींनी बडोद्यामधूनही निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही ठिकाणी विजयी झाल्यानंतर मोदींनी बडोद्याची जागा सोडून दिली होती. वाराणसीच्या विकासासाठी कमी पडू देणार नाही असं आश्वासन मोदींनी दिलं होतं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close