इंग्लंडचा धुव्वा, भारताचा 6 विकेटने शानदार विजय

August 30, 2014 10:21 PM0 commentsViews: 2401

 india 6345 30 ऑगस्ट : कसोटी सामन्यात पराभवाचा वचपा काढत भारताने सलग दुसर्‍यांदा दणदणीत विजय मिळवला आहे. ट्रेंट ब्रिजला रंगलेल्या तिसर्‍या वन डेत टीम इंडियाने इंग्लंडचा 6 विकेटनं पराभव केला आहे. या विजयाबरोबरच 5 मॅचच्या या सीरिजमध्ये टीम इंडियाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

कॅप्टन महेंद्रसिंग धोणीचा टॉस जिंकून पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय बॉलर्सनं खरा ठरवला. भारताने इंग्लंडला 227 रन्सवर ऑलआऊट केलं. तर भारतातर्फे अंबाती रायडूनं शानदार हाफ सेंच्युरी ठोकत भारताला विजय मिळवून दिला. अजिंक्य रहाणे, विराट कोहली आणि सुरेश रैनानं शानदार इनिंग पेश करत रायडूला चांगली साथ दिली.

5 मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने 2– ने आघाडी घेतल आहे. या अगोदर भारताने दुसर्‍या वनडेमध्ये 133 रन्सने शानदार विजय झाला होता. तर पहिली वनडे पावसामुळे रद्द करण्यात झाली होती.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close