शरीफ यांच्या घरावर ‘तेहरिक’ सर्मथकांचा हल्लाबोल

August 31, 2014 5:34 AM0 commentsViews: 329

Pak-protest-AFP31 ऑगस्ट :इम्रान खान आणि ताहीर-उल- कादरी यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान सरकारविरोधी निदर्शने करीत पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या राजीनाम्याची मागणी करीत येथील निवासस्थानाबाहेर जमलेल्या निदर्शकांवर पोलिसांनी बेधुंद लाठीमार केला. यामध्ये किमान दोन नागरिकांचा मृत्यू झाला, तर 450 जण जखमी झाले.

शरीफ यांना राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी तहरीक-ए-इन्साफचे प्रमुख इम्रान खान आणि आवामी तहरीकचे प्रमुख कादरी यांनी शनिवारी आपल्या समर्थकांना शरीफ यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचे आवाहन केले.

नवाज शरीफ यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी मागणी करत ते पंतप्रधानांच्या घरावर चाल करून गेले. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, त्यात शेकडो निदर्शक जखमी झाले. त्यात महिला आणि मुलांचाही समावेश आहे.पाकिस्तान पीपल्स पार्टीनं या प्रकाराचा निषेध केलाय. इम्रान खान यांनी नवाज शरीफांनी राजीनामा दिल्याशिवाय आपण इथून हलणार नाही असं जाहीर केलं आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानी संसदच्या जवळून निदर्शकांना हटवण्यात आलं आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close