महाराष्ट्रात भाजपला 50 टक्के जागा मिळाव्यात- नितीन गडकरी

August 31, 2014 12:50 PM2 commentsViews: 1562

Gadkari2

30 ऑगस्ट : महाराष्ट्रामध्ये युतीतील पन्नास टक्के जागा भाजपला मिळाव्यात अशी आमच्या अध्यक्षाची भूमिका आहे, त्याचा विचार झालाच पाहिजे अशी ठाम भूमिका  केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी IBN लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत मांडली आहे. जास्त जागा मागतानाच युतीमधील जागावाटपाचा वाद सामोपचाराने मिटेल हे सांगायला ते विसरले नाहीत.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आघाडी प्रमाणेच महायूतीतही जागावाटपाचा तिढा अजूनही सुटू शकलेला नाही, त्यावर गडकरी म्हणतात,  राज्यातल्या नेत्यांना जागा वाढवून हव्या आहेत.  युती ही खूप जूनी आहे. मात्र दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. दोघांनाही पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. युतीतील 144 जागा भाजपलाच मिळाव्यात.  राज्यात जागावाटपाचा निर्णय पक्षाध्यक्ष अमित शाहच घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आघाडी सरकारने राज्याला कर्जाच्या खाईत लोटले असून राज्यभरात जातीयवादाचे विष पेरले आहे, आता जनता त्यांना कंटाळली असल्याचे गडकरींनी सांगितले. महाराष्ट्र पुढे आहे, हा मुख्यमंत्र्यांचा दावा म्हणजे निव्वळ विनोद असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला दोष देऊ नये, मुख्यमंत्र्यांनी त्यापेक्षा आत्मपरीक्षण करावे असा सल्लाही त्यांनी यावेळेस दिला.
मेट्रोच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी नागपूर आणि विदर्भाच्याबाबतीत मुख्यमंत्र्यांच्या मनात द्वेष आहे. मेट्रोच्या मुद्यावरुन मी कुठलंही राजकारण केलं नाही. मी जस नागपूर मेट्रोचा पाठपुरावा केला तसं मुख्यमंत्र्यांनी पुणे मेट्रोचा पाठपुरावा का केला नाही ? पुणे मेट्रोच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी कागदपत्रांची पुर्तता पूर्ण केली नाही असा थेट आरोपही गडकरींनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे. नागपूर मेट्रोच्या कार्यक्रमाला न येऊन मुख्यमंत्र्यांनी आपलं मन छोटं असल्याचं दाखवून दिलं. विकासकामंच केली नसल्यामुळे मुख्यमंत्री जनतेला घाबरतात अशी बोचरी टीका ही त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
मला महाराष्ट्राचा अभिमान आहे. दिल्लीत बसून महाराष्ट्राची प्रगती झालेली पाहायचं आहे. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत मी नाही, राज्यातले नेते त्यासाठी सक्षम आहेत असं सांगत भाजपमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धासाठी नसून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील असे गडकरींनी स्पष्ट केले. देंव्रेद फडणवीस हे माझ्या लहानभावाप्रमाणे असल्याने त्यांच्यासोबत कोणताही वाद नाही अशी स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.
राज ठाकरे माझे मित्र असून त्यांची भेट घेण्यात काहीच गैर नाही. उद्धव ठाकरे, शरद पवार, नारायण राणे, सुशीलकुमार शिंदे आदी नेत्यांशीही माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यावर ऐवढी चर्चा करण्याचे काहीच कारण नाही असे गडकरींनी सांगितले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    भ्रष्टाचारांमुळे सामान्य जनता हैरान झाली आहे. आण्णा हजारे यांनी लोकपालसाठी अंदोलन केले. बी.जे.पी. ने लोकपालसाठी मोलाचे सहकार्य केल्याने लोकपाल बील पास झाले. त्यामुळे जनतेला बी.जे.पी. हा सत्तेसाठी पर्याय मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात ५० टक्के जागा पाहीजेत ही मागनी योग्यच आहे.

  • Sham Dhumal

    महाराष्ट्रातही बी.जे.पी.चे सरकार असणे आवश्यक आहे.

close