बिहारमध्ये रामविलास पासवान पराभूत

May 16, 2009 10:46 AM0 commentsViews: 2

16 मे, हाजीपूर लोक जनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचा बिहारमधल्या हाजीपूर इथून धक्कादायक पराभव झालाय. बिहारचे माजी मुख्यमंत्री रामसुंदर दास यांनी त्यांचा 37 हजार 954 मतांनी पराभव केला आहे. पासवान यांना 2 लाख 8 हजार 761 मतं मिळाली तर दास यांना 2 लाख 46 हजार 715 मिळाली आहेत. रामविलास पासवान यांनी याच मतदारसंघातून एकेकाळी 5 लाख एवढ्या मताधिक्यांनी विजय मिळवला होता. त्यानंतर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, युपीएचं धर्मनिरपेक्ष सरकार आलं ही आनंदाची गोष्ट आहे. जरी माझा हाजीपूरमधून पराभव झाला असला तरी हे कोणीच नाकारणार नाही की मी हाजीपूरमध्ये काम केलं आहे. आम्ही काँग्रेससोबत न गेल्याने आमचा पराभव झाला, असं म्हणण थोडं घाईचं होईल.

close