शिर्डीतून रामदास आठवले पराभूत : महत्त्वाच्या दलित नेत्यांचीही हार

May 16, 2009 11:08 AM0 commentsViews: 12

16 मे पंधराव्या लोकसभेच्या निवडणुकीत आरपीआयच्या रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर आणि राजेंद्र गवई या तीनही मात्तबर उमेदवारांचा पराभव झाला आहे. हा पराभव म्हणजे आरपीआय आणि इतर दलित पक्षांना बसलेला मोठा धक्का आहे, अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उठत आहे. शेवटच्या क्षणी शिर्डी मतदारसंघातून काँग्रेस कोट्यातून उमेदवारी मिळवलेल्या आरपीआयचे नेते रामदास आठवले यांना पराभव पत्करावा लागला आहे. शवसेनेचे भाऊसाहेब वाघचौरे यांनी त्यांना धूळ चारली आहे. तर अकोल्यातून भारीप-बमसचे प्रकाश आंबेडकर यांना भाजपचे संजय धोत्रे यांनी 64 हजार 848 मतांनी .मात दिली आहे. अमरावतीतून आरपीआयचे (गवई गट) राजेंद्र गवई यांना पराभवाला सामोर जाव लागलं आहे. त्यांना शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांनी 61 हजार 716 मतांनी पराभूत केलं आहे. शिर्डीत आठवले यांच्या पराभवामुळे संतप्त झालेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी देवळाली कॅम्प इथे काँग्रेसच्या प्रतिकारात्मक पुतळयाचं दहन केलं आहे. शिर्डीत काँग्रेसच्या बाळासाहेब विखे पाटील यांच्या छुप्या कारवायांमुळे आठवले यांना पराभवा लागल्याची चर्चा आहे. तर अमरावतीत काँग्रेसने गवई यांच्या विरोधात काम केल्याची चर्चा आहे. मात्र या पराभवाचे राज्याच्या विधानसभा निवडणुकीत दुरगामी परिणाम होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करताहेत.

close