धुळ्यात आरटीआय कार्यकर्ते संग्राम पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला

August 31, 2014 7:07 PM0 commentsViews: 1231

RTI Activist

31  ऑगस्ट : धुळ्यामध्ये आरटीआय कार्यकर्ते संग्राम पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. म्हाडाचे माजी सभापती किरण शिंदे यांनी हा हल्ला केला, असा संग्राम पाटील यांचा आरोप आहे. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या पाटील यांची प्रकृती चिंताजनक आहे. याआधीही किरण शिंदे यांनी आपल्याला धमक्या दिल्या होत्या, असं संग्राम पाटील यांनी त्यांच्या जबाबात म्हटलं. पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close