पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जपान दौर्‍याचा दुसरा दिवस, मोदी टोकियोत दाखल

August 31, 2014 3:50 PM0 commentsViews: 219

BwXoDqdCYAA5k-O

31 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जपान दौर्‍याचा आज दुसरा दिवस आहे. आज ते क्योटोमधून टोकियोत दाखल झाले आहेत. आर्थिक आणि संरक्षणात्मक संबंध सुधारणं हा मोदींच्या या जपान दौर्‍याचा मुख्य उद्देश आहे. मोदी यांनी आज सकाळी क्योटोच्या महापौरांची भेट घेऊन शहराचा वारसा जतन करण्यासाठी आखलेल्या कार्यक्रमाची माहिती घेतली.

क्योटोच्या धर्तीवर काशीचा विकास करण्यासंबंधीचा करार कालच मोदी आणि आबे यांच्यात झाला. पंतप्रधान मोदी यांनी क्योटोतल्या 14व्या शतकातल्या किंकाकुझी या बौद्ध मंदिराला आणि आठव्या शतकातल्या तोजी मंदिरालाही भेट दिली. क्योटो विद्यापीठातल्या स्टेम सेल रिसर्च विभागाला भेट देऊन सिकल सेल आजारावरच्या उपाचारासंबंधी चर्चा केली. सिकलसेल उपाचाराच्या संशोधनात मदत करण्याचं आश्वासन जपाननं दिलं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close