मनमोहन सिंगच यूपीएचे निर्विवाद पंतप्रधान – शरद पवार

May 16, 2009 11:04 AM0 commentsViews: 6

16 मे,देशाच्या जनतेने स्थिर सरकार देऊ शकणार्‍या यूपीए आघाडीला बहुमतानं निवडून दिलं आहे. त्यामुळे मनमोहन सिंगच यूपीएचे निर्विवाद पंतप्रधान असल्याचं शरद पवारांनीही मान्य केलं आहे. हे मान्य करताना भाजपचं निवडणुकीदरम्यान राबवलेलं कॅम्पेन फेल गेलं आहे, असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. पंतप्रधानपदासाठी इच्छुक उमेदवार शरद पवार यांनी तिसरी आघाडी एकसंध ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण शरद पवार आणि डाव्या पक्षांच्या रणनितीमध्ये काँग्रेसला बाहेरून पाठिंबा द्यायला भाग पाडण्याची त्यांची खेळी सपशेल फसली असल्याचं समजतंय. डाव्यांनीही पराभव मान्य करून विरोधी बाकावर बसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

close