मोदी आणि जपानच्या पंतप्रधानांची आज शिखर परिषद

September 1, 2014 8:43 AM0 commentsViews: 408

Modi with japan ABE
01 सप्टेंबर :   पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांची आज शिखर परिषद होणार आहे. मोदींच्या जपान दौर्‍याचा आज तिसरा दिवस आहे.

या शिखर परिषदेत पायाभूत सुविधा, संरक्षण आणि अणुकरारा या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे पण अणुकरारावर सह्या होतील की नाही, याबाबत साशंकता आहे. मोदी आणि आबे यांचे खूप जवळचे संबंध आहेत. याचा फायदा भारत आणि जपानच्या संबंधांना होऊ शकतो. आबे आपल्या ट्विटर अकाऊंटवर फक्त तीन जणांना फॉलो करतात, त्यात मोदींचाही समावेश आहे. त्यामुळए मोदींच्या जपान दौर्‍यावर चीन आणि अमेरिकेसह अख्ख्या जगाचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मोदींनी आज सकाळी जपानी उद्योगपतींशी संवाद साधला. भारत आणि जपानने एकत्र काम करून जागतिक अर्थधव्यवस्थेचं नेतृत्व केलं पाहिजे, असं अतिशय सूचक वक्तव्य मोदींनी यावेळेस केलं. जपानी गुंतवणुकदारांचा सहाय्यासाठी पंतप्रधान कार्यालयात विशेष टीम निर्माण करण्याचं आश्वासन मोदींनी दिलं. आपल्या पंतप्रधान कार्यालयात जपानी शैलीची शिस्त निर्माण करायचा आपला प्रयत्न आहे, असंही मोदी म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close