विदर्भात काँग्रेस-राष्ट्रवादीचं जबरदस्त कमबॅक

May 16, 2009 11:44 AM0 commentsViews: 4

16 मे विदर्भात 15 व्या लोकसभेच्या निवडणुकरी कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं जबरदस्त कमबॅक करत 10 जागांपैकी 5 जागेवर विजय मिळवलाय. 5जागांपैकी कॉग्रेसन वर्धा, नागपूर, रामटेक, गडचिरोली या जागांवर विजय मिळवलाय. तर राष्ट्रवादीन भंडारा मतदारसंघातून विजय संपादन केलाय. शिवसेनेनेवाशिम, बुलढाणा, अमरावती या मतदारसंघात विजय मिळवला आहे. तर भाजपनं अकोला ,चंद्रपूर मतदारसंघ राखण्यात यश मिळवलंय. गेल्या वेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत 11 मतदारसंघापैकी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने केवळ नागपूरात विजय मिळवला होता. दरम्यान वाशिममधून एव्हीएम मशीनमध्ये झालेल्या तांत्रिक दोषामुळे मतमोजणीची प्रक्रिया संथ सुरू होती.

close