उद्धव ठाकरे-अमित शाहांची भेट होणार -तावडे

September 1, 2014 5:53 PM0 commentsViews: 1151

vinod tawade and amit shah on udhav01 सप्टेंबर : जागावाटपावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये कुठलाही तणाव नाही असं स्पष्टीकरण भाजपचे नेते विनोद तावडे यांनी दिलंय. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट होणार असल्याचंही तावडेंनी सांगितलंय. आयबीएन
लोकमतशी ते बोलत होते.

विधानसभा निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे मात्र अजूनही महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. परंतु महायुतीतल्या घटक पक्षांचं जागावाटप पूर्ण होत आलंय. सर्व घटक पक्षांसोबत चर्चा सुरू आहे लवकरच जागावाटपाचा प्रश्न सोडवण्यात येईल असं विनोद तावडे यांनी स्पष्ट केलंय.

तसंच मीडियामधून युतीबद्दल येत असलेल्या बातम्या निराधार आहे. भाजपने सेनेच्या जागेबद्दल कोणताही सर्व्हे केला नाही असंही तावडेंनी सांगितलं. त्याचबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भेट होणार आहे असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी अमित शाह लवकरच महाराष्ट्र दौर्‍यावर येणार आहे. मात्र शाह आणि ठाकरे यांची भेट होणार नाही अशी चर्चा रंगली आहे.

तर दुसरीकडे भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी आयबीएन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत महायुतीत भाजपला 50 टक्के जागा मिळाव्यात असं मत व्यक्त केलं होतं. पण भाजपच्या या मागणीमुळे शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली. मला वेगळं व्हायचं असं नाटक काही दिवसांपूर्वी चांगलंच गाजलं होतं त्यानंतर आता पुन्हा मला वेगळं व्हायचं भाजपच्या प्रमुख नेत्यांनी सुरू केलंय. कसं वेगळं व्हायचंय ? तुम्हाला हिंदूत्वापासून वेगळं व्हायचंय का ? हे भाजपने ठरावं असा थेट इशाराचा सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी दिलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close