चंद्रपूरमध्ये भाजपला मिळालं यश

May 16, 2009 11:55 AM0 commentsViews: 1

16 मे चंद्रपूरमधून भाजपचे हसंराज अहिर हे दुसर्‍यांदा विजयी ठरलेत. त्यांनी काँग्रेसचे नरेश पुगलीया यांना 37 हजार मतांनी पराभूत केलं आहे. हसंराज अहिर यांनी 2 लाख 8 हजार 539 मतं मिळवली आहेत. काँग्रेसच्या नरेश पुगलिया यांना 1 लाख 79 हजार 42 मतं मिळालीत. चंद्रपूरमधून शेतकरी संघटनेचे वामनराव चटप उभे राहिले होते. त्यांच्या पदरात 1 लाख 22 हजार 333 मतांचं दान पडलंय.

close