भैय्या देशमुख अजित पवारांविरोधात निवडणूक लढवणार

September 1, 2014 6:59 PM0 commentsViews: 6391

bhaiya deshmukh vs ajit pawar01 सप्टेंबर : ज्यांच्यामुळे आपल्या राजकीय कारकीर्दीत सर्वात मोठी घोडचूक करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आता विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासोबत दोन हात करावे लागणार आहे. भैय्या देशमुख यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केली आणि आपण अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार असं देशमुख यांनी जाहीर केलंय. महायुतीनं तिकीट दिलं तर त्यांच्या तिकीटावर निवडणूक लढवणार असंही देशमुख यांनी स्पष्ट केलंय.

मागील वर्षी मुंबईत आझाद मैदानात भैय्या देशमुख यांनी उजनी धरणात पाणी सोडावं या मागणी धरणं आंदोलन केलं होतं. त्यांच्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्वाच्य भाषेत टीका केली होती. ‘पाणीच नाही तर मुतता का तिथे’ अशा शब्दात पवारांनी खिल्ली उडवली होती. त्यांच्या या वक्तव्याचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले होते. अखेरीस अजित पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतली ही सगळ्यात मोठी चुकी होती. मला माफ करा अशा शब्दात आपला माफीनामा सादर केला होता.

आज भैय्या देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे यांच्यासोबत चर्चा झालीये. जर त्यांनी मला तिकीट दिलं तर बारामतीतून अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असं देशमुख यांनी स्पष्ट केलं. लोकसभा निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे, भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे आणि महादेव जानकर यांच्यासोबत माझी चर्चा झाली होती. तेव्हा मला बीडच्या एल्गार सभेत पाठींबा देण्याचा आग्रह केला होता. त्यावेळी लोकसभेत तिकीट देण्याचा विचार करू असं आश्वासन दिलं होतं. पण आता विधानसभा निवडणूक आलीये पण मला कोणत्याही बैठकीला बोलावण्यात आलं नाही असंही देशमुख म्हणाले. आपण लवकरच पुन्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून तिकीटासाठी मागणी करणार आहोत असंही देशमुख यांनी सांगितलं.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close