उद्धव ठाकरे वेटिंगवर, शाहांसोबत भेटीचा सस्पेन्स कायम

September 1, 2014 8:03 PM1 commentViews: 1582

udhav fadnavis01 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झालीये पण दुसरीकडे युतीत मानापानाचं नाट्य रंगलंय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार आहे. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट होणार आहे असं विनोद तावडे यांनी सांगितलं होतं पण भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मात्र त्यांचा मुद्दा खोडून काढत असा कोणताही कार्यक्रम ठरला नाही असं स्पष्ट केलंय. भाजपच्या प्रचार समितीची बैठक मुंबईत पार पडली या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी माहिती दिली.

महायुतीत जागावाटपाबाबत सर्व पक्षांसोबत चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मुंबईत येणार आहे. शाह यांच्यासोबत होणार्‍या बैठकीत याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. आतापर्यंत झालेल्या चर्चेची तपशील देण्यात येईल त्यानंतर शाह जो निर्णय देतील त्याची अंमलबजावणी केली जाईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत त्यांची भेट होणार आहे का ? असा प्रश्न विचारला असता देवेेंद्र फडणवीस म्हणाले की, शाह-ठाकरे यांच्या भेटीचा असा कोणताही कार्यक्रम अजून ठरलेला नाही असं स्पष्ट केलंय. मात्र भाजपचे नेते विनोद तावडे यांनी अमित शाह आणि उद्धव ठाकरे यांची भेट होणार असल्याचं सांगितलं होतं मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा मुद्दा खोडून काढला आहे. अमित शाह या आठवड्यात मुंबईत येणार आहे. अमित शाह मुंबईतील गणेश मंडळांना भेटी दिल्यानंतर भाजपचे नेते आणि पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Sham Dhumal

    मुख्यमंत्री शिवसेनेचाच अशी भूमीका ठेवली तर ते “विनाशकाले विपरीत बुध्दी” हॊईल.
    लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश हे मोदींच्या नावामुळे मिळाले आहे.
    ५० टक्के जागा मिळण्याची बी.जे.पी.ची मागणी चुकीची नाही.

close