युती तुटू देणार नाही -आठवले

September 1, 2014 8:38 PM0 commentsViews: 1729

ramdas athavale on joshi01 सप्टेंबर : नितीन गडकरी यांनी 50 टक्के जागा भाजपाला मागितल्या तरी मी महायुतीमध्ये खंबीरपणे उभा राहून युती तुटणार नाही यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असं आश्वासन रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलंय.

तसंच बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघाची जागा आरपीआयला सोडावी अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे. रामदास आठवले हे आज (सोमवारी) बुलढाणा येथे आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.

बुलडाणा जिल्ह्यातल्या मेहकर विधानसभा या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी खोट्या जात प्रमाणपत्रावर निवडणूक लढवली होती. ते निवडूनही आले पण त्यांचं जात प्रमाणपत्र बोगस असल्याचा निर्णय नागपूर हायकोर्टाने दिलाय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा राखीव मतदार संघ आरपीआयला सोडा अशी मागणी करणार असल्याचं रामदास आठवलेंनी सांगितलं.

भाजपा सेना युती तुटली तर आमच्या आरपीआयसोबत जो पक्ष राहिल त्याच्यासोबत आम्ही राहू आणि जरी नितीन गडकरी यांनी 50 टक्के जागा भाजपाला मागितल्या तरी मी महायुतीमध्ये खंबीरपणे उभा राहून युती तुटणार नाही यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असंही आठवले म्हणाले. तसंच गोपीनाथ मुंडे हे आमच्या महायुती मधील समन्वयक होते ते आज नसल्याने आम्हाला नक्कीच अडचणी येत आहेत आणि उणीव भासत असल्याची खंत आठवले यांनी व्यक्त केली. अभिनेत्री राखी सावंत हिला विधानसभा निवडणुकीत तिकीट देणार का ? या वर बोलताना आठवले यांनी सांगितले की, निवडून येण्यासारखी जागा असेल त्यावर आम्ही राखी सावंतला तिकीट देण्याबाबत नक्कीच विचार करू असंही आठवले म्हणाले.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close