रत्नागिरीत पुन्हा एकदा राणे पॅटर्न यशस्वी

May 16, 2009 12:13 PM0 commentsViews: 73

16 मे, रत्नागिरी लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा राणे पॅटर्न यशस्वी झाला आहे. नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे विजयी झाले आहेत. शिवसेनेच्या सुरेश प्रभुंपेक्षा त्यांना तब्बल 46 हजार 750 मतं अधिक मिळाली. अपेक्षेप्रमाणे मताधिक्य नसल्याचं नारायण राणे यांनी कबूल केल आहे तर शिवसेनेच्या पराभवाची जबाबदारी रत्नागिरी शिवसेना जिल्हाप्रमुखांनी स्वीकारलीय. निलेश राणे हे काँग्रेसमधून निवडून आलेले सवांर्त तरुण खासदार ठरलेत. निलेश राणे यांनी आपल्या विजयासाठी जनतेचे आभार मानले आहेत.

close