‘आयबीएन-लोकमत’ आणि ‘सीएसडीएस’ पोस्ट पोल सर्व्हे ठरला खरा

May 16, 2009 12:35 PM0 commentsViews: 5

16 मे, यूपीएचा जय हो सुरू आहे. काँग्रेस 258 जागांवर आघाडीवर आहे. सीएसडीएस आणि आयबीएन-लोकमत सर्व्हेचा अंदाज खरा ठरला आहे. 'आयबीएन-लोकमत' आणि 'सीएसडीएस' पोस्ट पोल सर्व्हेच्या अंदाजानुसार युपीएला 210 ते 225 जागा, तर एनडीएला 180 ते 195 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. तर तिसर्‍या आघाडीच्या सरकार स्थापनेच्या स्वप्नाला धक्का बसणार असून त्यानां 95 ते 110 जागांवर समाधान मानावं लागेल असंही भाकित करण्यात आलं होतं. सध्या हातात आलेल्या माहितीनुसार यूपीए 258, एनडीए 162, तिसर्‍या आघाडीला 69, चौथी आघाडी 11, इतर 15 जागा मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे.

close