मंगळयानानं अंतराळात केले 300 दिवस पूर्ण

September 2, 2014 9:20 AM0 commentsViews: 865

earth-mars_2304944b

02 सप्टेंबर :  भारतासाठी अभिमानाची आणि ऐतिहासिक अशी महत्वाकांक्षी मंगळयान मोहिमने अंतराळात 300 दिवस पूर्ण केले असून अत्यंत यशस्वीपणे मंगळाच्या दिशेने त्याची वाटचाल सुरु आहे. मंगळाच्या कक्षेत फक्त 22 दिवसात हे यान प्रवेश करेल. 5 नोव्हेंबर रोजी भारताच्या पहिल्या मंगळ यानानं यशस्वी उड्डाण केलं होतं त्यानंतर 1 डिसेंबरनंतर हे यान पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडलं आणि आता येत्या 24 सप्टेंबरला हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल.

हे यान 24 सप्टेंबर 2014 ला हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल आणि 6 महिने ते मंगळाभोवती प्रदक्षिणा करेल. जगभरात आखण्यात आलेल्या आतापर्यंतच्या मंगळ मोहिमांपैकी निम्म्या मोहिमा अपयशी झाल्या आहेच. त्यातही पहिल्याच प्रयत्नात कोणतीही मोहीम यशस्वी झालेली नाही. त्यामुळेच आता भारताच्या मंगळमोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागले आहे.

असा आहे मंगळ !

 •  सूर्यमालेतला चौथा ग्रह
 •  पृथ्वीपेक्षा लहान ग्रह
 •  पृथ्वीपासून अंतर 40 कोटी किमी (अंतर बदलू शकतं)
 •  सध्या मंगळ पृथ्वीच्या सर्वात जवळ
 •  मंगळावरचा दिवस 24 तास 39 मिनिटांचा
 •  मंगळावरचं गुरुत्वाकर्षण 28 %
 •  आयर्न ऑक्साईडमुळे लाल रंग
 •  मंगळावर जीवसृष्टीला अनुकूल वातावरण असण्याची शक्यता
 •  मंगळावर गोठलेल्या अवस्थेत पाणी असल्याचे पुरावे
 •  मंगळावरच्या मिथेनची तपासणी सुरू

मिशन मार्स

 •  अल्फा फोटोमीटर – मंगळावर आणि मंगळाच्या कक्षेत पाणी आहे का हे पाहण्यासाठी
 •  मिथेन सेन्सर – मंगळावरच्या जीवसृष्टीची माहिती सांगणार्‌या मिथेनचं परीक्षण करण्यासाठी
 •  न्यूट्रल कम्पोझिशन ऍनालायझर – मंगळावरच्या वेगवेगळ्या घटकांची माहिती घेण्यासाठी
 •  मार्स कलर कॅमेरा – मंगळाचे फोटो पाठवण्यासाठी
 •  स्पेक्ट्रोमीटर – मंगळावरच्या उष्म्याच्या उत्सर्जनाचं प्रमाण

 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close