देवळालीचा ग्राऊंड रिपोर्ट, बबन घोलपांवर मतदार नाराज

September 2, 2014 11:24 AM0 commentsViews: 391

दीप्ती राऊत, नाशिक

02 सप्टेंबर : कोर्टाच्या शिक्षेनंतर शिवसेनेचे उपनेते बबन घोलप यांची आमदारकी रद्द झाली आहे. नाशिक रोड- देवळाली हा घोलप यांचा मतदारसंघ. आजही प्यायला पाणी नाही की महिलांना शौचालयं नाहीत अशी इथली विदारक परिस्थिती. त्यामुळे इथले मतदार त्यांच्यावर नाराज असल्याचं चित्र दिसतंय.

घोलप गेल्या 25 वर्षांपासून नाशिक रोड – देवळाली मतदार संघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवडून जाताहेत. यंदा देवळाली मतदार संघात प्रचार सुरू आहे, पण तो त्यांच्या मुलाचा, योगेशचा.

राष्ट्रवादीचे नाना सोनवणे हे गेल्या वेळचे घोलपांचे प्रतिस्पर्धी. बहुतेक यंदाही तेच प्रतिस्पर्धी असतील.

या मतदार संघात मूलभूत सुविधाही दिसत नाहीत. युवकांसाठी रोजगार, आर्थिक प्रगतीसाठी उद्योग ही तर खूप दूरची बात आहे. काहीही असलं तरी आमदारकी आपल्याच घरात राहावी यासाठी घोलप प्रयत्नांची पराकाष्ट करताहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close