कुठे आहे अच्छे दिन ?, मोदी सरकारकडून साफ निराशाच -मुख्यमंत्री

September 2, 2014 6:22 PM1 commentViews: 1304

cm on modi02 सप्टेंबर : ‘अच्छे दिन’ असं गोंडस स्वप्न दाखवून सत्तेवर मोदी सरकारला 100 दिवस झाले खरे पण प्रचंड निराशाच हाती आली आहे. आतापर्यंत असा कोणताही ठोस निर्णय मोदी सरकारने घेतलेला नाही अशी टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

तर 100 दिवसांमध्ये भाजप सरकारचा खरा चेहरा उघड पडलाय असा टोला प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी लगावला. काँग्रेसने आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलं होतं. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी केंद्र सरकारवर एकच हल्लाबोल केला.

काँग्रेसने काल सोमवारी प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर आता अधिक आक्रमक होतं मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारने 100 दिवसांत कोणतेही असे ठोस काम केले नाही. यूपीए सरकारने ज्या योजना लागू केल्या होत्या जी विकासकामं केली होती त्याची उद्घाटन फक्त मोदींनी केलीये. उलट मोदींनी यूपीएच्या काही महत्वाकांक्षी योजना बंद पाडल्या आहेत असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.

मोदींनी आपली दहशत पसरवली आहे. सर्व मंत्र्यांचे अधिकार कमी केले आहेत तर ज्येष्ठ नेत्यांना कस्पटासमान बाहेर काढून टाकण्यात आलंय. मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी यांना संसदीय समितीत जागा देण्यात आली नाही. हा एकाधिकारशाहीचा प्रयत्न याला मिनिमम गव्हर्नन्स म्हणायचं का ? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलाय.

तसंच राज्यात राबवलेल्या योजना केंद्रात राबवण्याची सूचना आणि राज्यातील ब्लड ऑन कॉल देशभरात राबवली जाणार याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्राचं अभिनंदनही केलं. काळापैसा आणणार अशी घोषणा केली पण 100 रुपये तरी आणलेत का ? असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. तर मोदी सरकार कोणतीही आश्वासनं पूर्ण करू शकलं नाही. त्यामुळे 100 दिवसांत भाजप सरकारचा खरा चेहरा उघड पडलाय. हे गरिबांचं नव्हे तर धनदांडग्यांचं सरकार आहे अशी टीका प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • akhtar

    apan Gujrat baher kadhich gela nahit, pan kal Nepal la Aaj Japan la and udya Amerike la aaho hech ahe acche din………

close