आघाडी न झाल्यास मैत्रीपूर्ण लढत, ठाकरेंनी दिले संकेत

September 2, 2014 9:36 PM0 commentsViews: 1723

 manikrao_thakare_onNCP02 सप्टेंबर : ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून होईना’ अशी अवस्था आघाडीची झालीये. जर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही तर मैत्रीपूर्ण लढत देऊ असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी दिले आहे. राष्ट्रवादीमुळेच चर्चेचं घोडं अडलंय अशी टीकाही ठाकरे यांनी राष्ट्रवादीवर केली आहे. ते आयबीएन लोकमतशी बोलत होते.

कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होणार आहे. मात्र आघाडीचं अजूनही तळ्यात-मळ्यात सुरूच आहे. जागावाटपावरुन चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्षांकडून चर्चा सुरू असून लवकरच यावर तोडगा काढला जाईल पण आज आघाडी व्हावी अशी आमची इच्छा आहे कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसची लढाई ही भाजपच्या विरोधातच आहे. पण जर उद्या आघाडी होऊ शकली नाही तर मैत्रीपूर्ण लढत देऊ असं मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केलंय. तसंच आता निवडणुकांच्या तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे जितक्या लवकर जागावाटपाचा तिढा सुटेल तितकं चांगलं होईल अशी अपेक्षाही माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close