मुख्यमंत्रीपदाची ऑफर आली तर बघू -पंकजा मुंडे

September 3, 2014 8:03 AM1 commentViews: 3961

PANKAJA SOT303 ऑगस्ट : मुख्यमंत्रीपदाचा आताच विचार नाही, पण ऑफर आली तर काय? तर तेव्हा बघू अशी सावध प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांनी यांनी दिली.

दोन महिन्याआधी निवडणुका झाल्या असत्या तर लोसकभा लढवली असती, मात्र आता सध्या राज्याच्या राजकारणाकडे जास्त कल आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. सध्या राज्यात गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा देत असल्याचंही त्या म्हणाल्या.

पंकजा मुंडे यांची संघर्षयात्रा सुरू आहे. यादरम्यान त्यांना पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार का ? असं विचारलं असता ‘मुख्यमंत्रीपदाचा आताच विचार नाही, असं सांगितलं. पण ऑफर आली तर काय? असं विचारलं असता. ऑफर आली तर तेव्हा बघू अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलीय. या संघर्ष यात्रेच्या समारोपा प्रसंगी स्मृती इराणी आणि पंकजा मुंडे यांना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीनं अश्रू आवरता आले नाहीत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • Amit

    mag paise khayala bannaar na CM.

close