इंदापूरमध्ये एकाच आठवड्यात दोन निर्घूण हत्या

September 3, 2014 11:13 AM0 commentsViews: 1151

shutterstock_68616409

03 सप्टेंबर : राज्यात ठिकठिकाणी ‘मुलगी वाचवा’ या अभियानासाठी सरकारने मोठ मोठे उपक्रम हाती घेतले पण इंदापूरमध्ये एकाच आठवड्यात दोन स्त्री भ्रूण हत्येच्या घटना उघडकीस आल्या आहेत. इंदापूर तालुक्यात अलिशा मुलानी या विवाहितेला तिच्या पोटातला गर्भ मुलीचाच आहे, अशी माहिती एका पुजार्‍यानं दिली होती. त्यावर विश्वास ठेवत तिच्या घरातल्यांनी तिचा छळ केला. गर्भपात करण्यासाठी नकार देणार्‍या अलिशाला तिच्या सासरच्यांनी बेदम मारहाण करून तिची उपासमार केली. यामुळे तिच्या पोटातलं बाळ दगावलं. एवचं नाही तर तब्बल 10 दिवस मृत बाळ तिच्या गर्भातचं होतं.

अलिशाने सासरच्या लोकांवर स्त्री भ्रूण हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली पण पोलिसांनी मात्र किरकोळ गुन्हे दाखल केल्याने आरोपी मोकाटच आहेत. तर इंदापूरमधल्याच आणखीन एका घटनेत अश्विनी विलास ठवरे या विवाहितेचा तिसरी मुलगी नको म्हणून छळ करण्यात आला. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या प्रकरणी अश्विनीच्या नवर्‍याला – विलास ठवरेला अटक करण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close