‘मातोश्री’परंपरा मोडीत, शाह-ठाकरे भेट नाही ?

September 3, 2014 9:52 PM0 commentsViews: 3255

vinod tawade and amit shah on udhav03 सप्टेंबर : महायुतीत जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे पण आता युतीत मानापमानचे संगीत रंगले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उद्या मुंबईत येणार आहे. मात्र शाह ‘मातोश्री’वर येणार नसल्याचं कळतंय. त्यामुळे यावेळी भाजपकडून ‘मातोश्री’ची प्रथा मोडीत काढली जाणाची शक्यता आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उद्या गुरुवारी मुंबईच्या एक दिवसांच्या दौर्‍यावर येत आहे. सकाळी 11 वाजता मुंबई एअरपोर्टवर त्यांचं स्वागत करण्यात येईल. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. त्यात आगामी विघानसभा निवडणुकीचा आढावा, जागावाटप आणि पक्षप्रवेश यांची चर्चा करण्यात येईल.

दुपारी विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या घरी अमित शाह भेट देणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता मुंबईतल्या सर्व भाजप पदाधिकार्‍यांना षण्मुखानंद हॉलमध्ये ते मार्गदर्शन करणार आहेत. अमित शहा यांच्या उपस्थितीत नांदेडचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

पण त्यांच्या उद्याच्या कार्यक्रमात मातोश्री भेटीचा उल्लेखच नाही. दोनच दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनीही ‘मातोश्री’ भेटीचा असा कोणताही कार्यक्रम नाही असं स्पष्ट केलं होतं. परंतु अमित शाह यांनी अमित शाह यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी अशी अपेक्षा सेनेचे नेते दिवाकर रावते यांनी व्यक्त केली.

आजपर्यंत भाजपचा कोणताही बडा नेते मुंबईत आला तर त्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेत असतं. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन आणि अलीकडेच नरेंद्र मोदी यांच्यासह आदी नेत्यांनी ‘मातोश्री’वर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. ही प्रथा नेहमीची ठरलेली होती.

मात्र आता भाजपकडून ही प्रथा बंद पाडण्याचा कयास दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमित शाह पहिल्यांदाच मुंबईला येत आहे. त्यामुळे अमित शाह उद्या ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का ? हे पाहण्याचं ठरणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close