‘राहुल गांधींना पराभवाला जबाबदार धरू नका’

September 3, 2014 9:42 PM5 commentsViews: 532

76rahul_gandhi03 सप्टेंबर : लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आणि या पराभवाचं खापरं काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या फोडण्यात आलं. काही काँग्रेस नेत्यांनी तर राहुल गांधींना पदावरुन हटवा असा सूरच लगावला. पण आता पक्षातील तरूण कार्यकर्त्यांनी राहुल गांधींना पराभवाला जबाबदार धरू नका असं पाठराखण करणार पत्रच दस्तरखुद्द राहुल यांना लिहलंय.

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसमध्ये नव्या जुन्यांचा वाद वाढत चाललाय. काँग्रेसच्या तरुण नेत्यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना पाठिंबा देणारं एक पत्र लिहिलंय.

लोकसभा निवडणुकीतल्या पराभवासाठी राहुल गांधींना दोष देता येणार नाही, असं या पत्रात म्हटल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

हे पत्र लवकरच पक्षातल्या सर्व नेत्यांना पाठवण्यात येणार आहे. पराभवासाठी राहुल गांधींना जबाबदार धरण्यापेक्षा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, असं या नेत्यांचं म्हणणं आहे. पक्ष नेत्यांनी आपली नाराजी पक्षाच्या व्यासपीठावर मांडावी, सार्वजनिक ठिकाणी नाही, असंही मत या पत्रात मांडण्यात आल्याचं कळतंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 • Sham Dhumal

  जनतेने कॉंन्ग्रेसची सत्तेतून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे जनता बरोबर सांगेल कि राहुल गांधी पराभवाला जबाबदार आहेत का नाही.
  जनतेला विचारा जनता योग्य उत्तर देईल.

 • Sham Dhumal

  गेल्या १० वर्षात केलेला विकास कुठे आहे? राहुल गांधींना १० वर्षात विकास करता आला नाही तर मग आता ४ महिन्यात प्रश्न कसे विचारायला लागलेत?

 • Sham Dhumal

  लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने भ्रष्टाचाराच्या आणि जाती धर्माचे राजकारण करतात त्यांच्या विरोधात मतदान केले आहे. हे जर कांही नेत्यांना कळत नसेल तर ते त्यांचे दुर्दैव आहे.

 • Sham Dhumal

  कॉंन्ग्रेस पक्ष हा घराणेशाहीची हुकुमशाही माणनारा पक्ष झाला आहे. नेतृत्वाने कितीही चुका केल्या तरी चांगलेच आहे म्हणायचे अशी स्वत:ला सवयच लावून घेतली आहे. कारण विरोध करण्याची हिम्मत कोणामध्येही राहिलेली दिसत नाही. याचे कारण आहे पदाची लालसा. विरोध केल्यास आपल्याला डावलले जाईल ही भीती.

 • Sham Dhumal

  ज्यांच्यामुळे कॉंन्ग्रेसचे पाणीपत झाले झाले तरीही त्या गांधी घराण्याशिवाय दुसरा कोणी नेतृत्व करण्यास योग्यतेचा नाही असे कॉंन्ग्रेसचे नेतेच दाखवून देत आहेत. तर जनता तरी का बरे कॉंन्ग्रेसला मतदान करेल?

close