नव्या मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती काँग्रेस स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता

May 17, 2009 6:35 AM0 commentsViews: 1

17 मे 15 व्या मंत्रिमंडळात काँग्रेस गृहखातं, अर्थखातं तसंच परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय ही तीन खाती स्वत:कडेच ठेवण्याची शक्यता आहे. मनमोहन सिंग यांच्या नव्या मंत्रिमंडळात अर्थखातं प्रणव मुखर्जी यांच्याकडे , गृहमंत्रालय चिदंबरम् यांच्याकडे राहणार असल्याची चर्चा आहे. विजयावर शिक्कामोर्तब केल्यानंतर काँग्रेसच्या सरकार स्थापन करण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या आहेत, हे या चर्चेवरून दिसून येत आहे. नवीन मंत्रिमंडळाची रूपरेषा ठरवण्यासाठी काँग्रेस कार्यकारिणीची आज सकाळी बैठक होतेय. उद्या सोमवारी सकाळी काँग्रेसचे नेते राष्ट्रपतींची भेट घेतील. त्यानंतर सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसकडून प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 15 व्या लोकसभेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असणार आहे. नव्या मंत्रिमंडळात गृहखातं, अर्थखातं, परराष्ट्र आणि संरक्षण मंत्रालय अशी महत्त्वाची खाती आपल्याकडंच ठेवण्याचे संकेत काँग्रेसनं दिलेत. यासाठी सोनिया गांधींनी युपीएतील घटकपक्षांशी बोलणी सुरू केली आहे.

close